
Kolhapur Politics
esakal
राज्यातील ३२ जिल्हा परिषदेसह ३३६ पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला.
अर्हता तारीख (त्या दिवशी अस्तित्वातील विधानसभा) - १ जुलै २०२५, गट व गणांची प्रारूप यादी प्रसिद्ध करणे - ८ ऑक्टोबर २०२५
प्रारूप यादीवर हरकती स्वीकारणे - ८ ते १४ ऑक्टोबर २०२५, अंतिम यादी प्रसिद्ध करणे, मतदान केंद्राची यादी - २७ ऑक्टोबर २०२५
Kolhapur Politics : राज्यातील ३२ जिल्हा परिषदेसह ३३६ पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादींचा कार्यक्रम जाहीर केला. मतदार यादी तयार करताना १ जुलै २०२५ रोजी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
दरम्यान, प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. यादीवर १४ ऑक्टोबरपर्यंत हरकती नोंदवता येतील. हरकतीवरील सुनावणीनंतर २७ ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच दिवशी मतदान केंद्रांची यादीही प्रसिद्ध होईल.