
Kolhapur ZP Elections
esakal
ठळक मुद्दे (Highlights)
आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला – कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद (६८ जागा) व पंचायत समित्या (१३६ जागा) निवडणुकांसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबर रोजी होणार.
प्रारूप अधिसूचना १४ ऑक्टोबरला – मंगळवार (१४ ऑक्टोबर) ते शुक्रवार (१७ ऑक्टोबर) दरम्यान हरकती व सूचना स्वीकारल्या जातील; अंतिम आरक्षण ३ नोव्हेंबरला जाहीर होईल.
राजकीय वातावरण तापणार – आरक्षण निश्चितीनंतर स्थानिक नेते व संभाव्य उमेदवारांमध्ये हालचाल वेग घेणार असून जिल्ह्यातील राजकारण तापण्याची चिन्हे.
Kolhapur Poltical News : कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी आरक्षण सोडत १३ ऑक्टोबरला जाहीर होईल. त्यानंतर मंगळवारी (ता. १४) प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाणार आहे. मंगळवार (ता. १४) ते शुक्रवार (ता. १७) दरम्यान हरकती व सूचना घेतल्या जाणार आहेत, तर ३ नोव्हेंबरला अंतिम आरक्षण जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.