Kolhapur Ganeshotsav : 'कोल्हापूरच्या राजा'चे जल्लोषात आगमन! 40 हून अधिक ड्रोन अन् ढोल-ताशांच्या गजराने आसमंत दुमदुमला, भाविकांची अलोट गर्दी

Kolhapurcha Raja Ganesh Idol Arrival : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि भक्तांच्या जयघोषात ‘कोल्हापूरचा राजा’ गणेशमूर्तीचे भव्य आगमन झाले. लालबागच्या राजाच्या रूपातील मूर्ती पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली.
Kolhapurcha Raja Ganeshotsav procession

Kolhapurcha Raja Ganeshotsav procession

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया...’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या कडकडाटात आणि गुलालाच्या उधळणीत रंकाळवेश गोल सर्कल मित्र मंडळाच्या ‘कोल्हापूरचा राजा’च्या गणेशमूर्तीचे आगमन (Kolhapurcha Raja Ganeshotsav procession) झाले. कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर उद्योगमंत्री उदय सामंत, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, पुष्कराज क्षीरसागर यांच्या हस्ते मूर्तीचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर कोल्हापूरच्या राजाची आगमन मिरवणूक काढण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com