
कोल्हापूर ; गेल्या दोन महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे, धबधबे सुरू आहेत, त्याचा आनंद घेण्यासाठी वर्षा पर्यटकांची गर्दी होत आहे अशा स्थितीत जंगली वाटांवरील वर्दळ व काही प्रमाणात हुल्लडबाजी वाढती आहे, त्यातून होणारी जंगलाची हानी, दुर्घटनांची शक्यता वाढती असूनही जिल्ह्यातील वन हद्दीत वनविभागाची गस्त यथातथाच आहे. त्यामुळे पावसाळ्यातील जंगल संपत्ती संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.