
गोकुळ दूध संघाने शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना
esakal
तीन हायलाइट पॉइंट्स :
‘गोकुळ’ दूध संकलन वाढवण्याचा मोठा संकल्प – पुढील एका वर्षात २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्यासाठी दहा हजार म्हशींचे वाटप व शेतकरी, शेतमजुरांना कर्जसहाय्य.
म्हैस दुधाला मोठी मागणी – मुंबई-पुणे बाजारपेठेत ‘गोकुळ’च्या म्हैस दुधाला चांगली मागणी असून, सीमाभाग व सांगली जिल्ह्यातूनही संकलन वाढवण्यावर भर.
सुपरवायझर स्पर्धा आणि प्रोत्साहन – १०० पेक्षा जास्त म्हैस खरेदी करून देणाऱ्या सुपरवायझरला एक लाख रुपयांचे बक्षीस; ग्रामीण भागातील अल्पभूधारकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन.
Gokul Milk Scheme : ‘गोकुळ’च्या दुधाला राज्यात चांगली मागणी आहे. म्हैस दुधाचे संकलन वाढवण्यासाठी दहा हजार म्हशींचे वाटप करण्याचा मानस असून, आजपासून एक वर्षात २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा गाठण्यासाठी अल्पभूधारक, शेतमजुरांनाही म्हैस खरेदीसाठी कर्ज दिले जाणार आहे. यासाठी, अधिकारी, सुपरवायझर यांनी पुढाकार घ्यावा, तसेच संचालकांनीही यातून काही तरी बोध घेऊन कामाला लागावे’, असे आवाहन वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केले. ‘गोकुळ’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात दूध संकलन वाढीसाठी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.