esakal | कोल्हापूरचा सरकारी दवाखानाच (सीपीआर) खरा तरणोपाय...!
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur's Government Hospital (CPR) is the real swimming pool ...!

कोल्हापूर ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) म्हणजेच जिल्ह्यातील सामान्य माणसांचे प्रमुख आधारवड. कोरोनाच्या काळातही हाच "थोरला दवाखाना' आमच्यासारख्या सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरला. किंबहुना सरकारी दवाखाने हेच खरे तरणोपाय आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कोरोनाने नव्हे तर श्‍वसनाच्या त्रासामुळे मी या ठिकाणी बारा दिवस उपचार घेतले आणि ठणठणीत बरा होऊनच डिस्जार्च घेतला. या काळात चार कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू डोळ्यादेखत पाहिले. मात्र, रुग्णालयातील प्रत्येक घटकाची कर्तव्याप्रती असणारी तत्परता अगदी जवळून अनुभवायला मिळाली...वारणानगर येथील देवदत्त कदम यांनी सोशल मीडियावरून हे अनुभव शेअर केले असून त्यांनी सरकारी आरोग्य यंत्रणेचे भरभरून कौतुक केले आहे. 

कोल्हापूरचा सरकारी दवाखानाच (सीपीआर) खरा तरणोपाय...!

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर ः छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर) म्हणजेच जिल्ह्यातील सामान्य माणसांचे प्रमुख आधारवड. कोरोनाच्या काळातही हाच "थोरला दवाखाना' आमच्यासारख्या सर्वसामान्य रुग्णांसाठी वरदान ठरला. किंबहुना सरकारी दवाखाने हेच खरे तरणोपाय आहेत, याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. कोरोनाने नव्हे तर श्‍वसनाच्या त्रासामुळे मी या ठिकाणी बारा दिवस उपचार घेतले आणि ठणठणीत बरा होऊनच डिस्जार्च घेतला. या काळात चार कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू डोळ्यादेखत पाहिले. मात्र, रुग्णालयातील प्रत्येक घटकाची कर्तव्याप्रती असणारी तत्परता अगदी जवळून अनुभवायला मिळाली...वारणानगर येथील देवदत्त कदम यांनी सोशल मीडियावरून हे अनुभव शेअर केले असून त्यांनी सरकारी आरोग्य यंत्रणेचे भरभरून कौतुक केले आहे. 
श्री. कदम सांगतात, ""कॉलेजवरून आल्यानंतर अंग गरम लागले म्हणून फॅमिली डॉक्‍टर असणाऱ्या डॉ. प्रताप पाटील यांच्याकडून औषधे घेऊन आलो. सगळीकडेच संसर्गजन्य तापाची साथ असल्यामुळे थोडी काळजी घेण्याची सूचना त्यांनी केली. पण, काही दिवसांनी पुन्हा ताप आला आणि अशक्तपणा जाणवू लागला. घरातल्या घरात चालल्यानंतरसुद्धा धाप लागू लागली. तेव्हा मात्र सर्वांनाच काळजी वाटू लागली. याच दरम्यान, कोरोनाचे अनेक किस्से ऐकायला मिळत होते. त्यामुळे मग एका कोविड सेंटरमध्ये दाखल झालो. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवरून हेल्पलाईन मिळवली आणि ऑक्‍सिजन बेडची चौकशी करताच "सीपीआर'मध्ये बेड मिळाला आणि एक दिवसच कोविड सेंटरमध्ये राहून "सीपीआर'मध्ये दाखल झालो.'' 
विश्रांती घेणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास न देता दर दोन तासांनी ऑक्‍सिजनची पातळी तपासणे असो किंवा औषधांच्या गोळ्यांवर प्रत्येक रुग्णाची नावे टाकून देण्यापर्यंत सर्व प्रकारची काळजी आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली. ज्येष्ठांची काळजी तर अगदी घरच्यांपेक्षाही अधिक चांगल्या पद्धतीने घेतली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रुग्णांना दिलेला सकस आहाराचे नियोजन तर एकदमच चांगले. इतक्‍या चांगल्या आहाराची कधीच अपेक्षा केली नव्हती. शेवटच्या तीन दिवसात चार कोरोनाबाधितांचे मृत्यू जवळून पाहिले. पण, चारही जणांना रक्तदाब, मधुमेह, पॅरालिसीस, दमा असे विविध आजार होते आणि दाखल होण्यापूर्वीच ते पूर्ण थकलेले होते, असेही श्री. कदम सांगतात. 

सकारात्मक बाजू 
फुफ्फुसाला झालेला संसर्ग आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मी स्वतः 30 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत "सीपीआर'मध्ये उपचार घेतले. कोणताही पक्ष अथवा सरकार यांचे समर्थन करण्याचा उद्देश अजिबात नाही. पण, आजवर संवेदनाशून्य आणि कामचुकार म्हणून बदनाम केल्या गेलेल्या सरकारी व्यवस्थेची अनुभवायला मिळालेली दुसरी बाजू सर्वांसमोर यावी, याचसाठी पोस्ट शेअर करत असल्याचे श्री. कदम यांनी आवर्जुन नमूद केले आहे.

संपादन - यशवंत केसरकर

loading image
go to top