कोलकत्यात झळकणार कोल्हापुरचे फुटबॉल टॅलेंट

Kolhapur's National Footballer Nikhil Suresh Kadam Signs With Kolkata's Mohomedan Sporting Kolhapur Marathi News
Kolhapur's National Footballer Nikhil Suresh Kadam Signs With Kolkata's Mohomedan Sporting Kolhapur Marathi News
Updated on

गडहिंग्लज : कोल्हापुरचा राष्ट्रीय फुटबॉलपटू निखिल सुरेश कदम कोलकत्ताच्या नामांकीत मोहोमेडन र्स्पोर्टिंगशी करारबध्द झाला आहे. कोलकत्यात नऊ जानेवारीपासून विना प्रेक्षक सुरू होणाऱ्या इंडियन फुटबॉल लिग (आयलिग) प्रथम श्रेणी स्पर्धेत मोहामेडन संघ सहभागी होणार आहे. त्यामुळे निखिलच्या रूपाने कोल्हापुरी फुटबॉल टॅलेन्ट आयलिगमध्ये झळकणार आहे. 

यापुर्वी निखिल इंडियन सुपर लिग (आयएसएल) स्पर्धेत नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून दोन मोसम खेळला आहे. गेल्या महिन्यात झालेल्या पात्रता स्पर्धेत विजेतेपद पटकावून मोहामेडन आय लिग स्पर्धेतसाठी पात्र ठरला आहे. या स्पर्धेत देशातील अव्वल अकरा संघ खेळणार आहेत. निखिलची शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीतून कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला. प्रशिक्षक जयदिप अंगीरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक धडे गिरवले.

त्यानंतर पुणे फुटबॉल क्‍लबमध्ये त्याच्या टॅलेन्टला अधिक चालना मिळाली. तो आघाडी आणि मध्य फळीतील उत्कुष्ट खेळाडू आहे. युवा आय लिगमध्ये धडाकेबाज खेळ करून त्याने पुणे एफसीला विजेतपद मिळवून दिले. त्याच्या सातत्यपुर्ण कामगिरीमुळेच पुणे एफसीने तरुणपणीच त्याला वरिष्ठ संघात सामावून घेतले. हा संघ बंद झाल्यावर त्याने पुण्याच्याच डिएसके शिवाजीयन्स संघाकडून आय लीग मध्ये खेळला. त्यानंतर एक मोसम मुंबईच्या मुंबई फुटबॉल संघाकडून आयलिग मध्ये प्रत्यनिधित्व केले. 

कोलकत्याच्या बलाढ्य मोहन बागान संघाकडूनही त्याने मैदान गाजविले आहे. त्याने भारतीय तेवीस वर्षाखालील संघाकडूनही आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी केली आहे. गेले दोन मोसम आयएसएलमध्ये नॉर्थ ईस्ट युनायटेडकडून खेळत होता. निखिलच्या कुटूंबालाही फुटबॉलचा मोठा वारसा आहे.

दरम्यान, ब्लॅक पॅंथर या नावाने प्रसिध्द असणारा मोहामेडन हा भारतीय फुटबॉलमधील सर्वात जूना (स्थापना 1891) संघ आहे. जागतिक फुटबॉल मधील दुसऱ्या क्रंमाकाची जुनी ड्युरॅंड चषक स्पर्धेचे दोन वेळा विजेतेपद, व्दितिय श्रेणी आय लिग स्पर्धेचे विजेतेपद, रोव्हर्स कप व आयएफए शिल्डचे सहावेळा विजेतेपद, कोलकत्ता लिगचे अकरा वेळा अजिंक्‍यपद अशी या संघाची दैदिप्यमान कामगिरी आहे. यामुळे या संघाचे देश परदेशात हजारो चाहते आहेत. 

विश्‍वास सार्थ ठरवेन 
"मोहामेडन हा यंदाच्या मोसमात भारतीय फुटबॉलची पंढरी असणाऱ्या कोलकत्याचा आयलिग मध्ये खेळणारा एकमेव संघ आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या या संघाकडून चाहत्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. मोहामेडन संघव्यवस्थानाचा विश्‍वास सार्थ ठरवेन. 
- निखिल कदम 

संपादन - सचिन चराटी 

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com