
अनुजा पाटील आणि शिवाली शिंदे यांची मोठी मजल
esakal
कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: अनुजा पाटील हिची महाराष्ट्र महिला वरिष्ठ टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड, शिवाली शिंदे हिचाही संघात समावेश.
स्पर्धेतील सामना वेळापत्रक: महाराष्ट्र संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी तमिळनाडूविरुद्ध, तर इतर सामने ९, ११ व १३ ऑक्टोबर रोजी अनुक्रमे मध्य प्रदेश, पाँडेचरी आणि राजस्थानविरुद्ध.
संपन्न क्रिकेट प्रवास: अनुजाने भारतीय संघासह आशिया कप, चॅलेंजर ट्रॉफीत खेळले असून महिला प्रीमियर लीगमध्ये विजेतेपद पटकावले; शिवालीनेही नॅशनल क्रिकेट अकादमी, इंटर झोनल स्पर्धा व चॅलेंजर करंडकात आपली चमक दाखवली आहे.
Cricket Sport Kolhapur :बीसीसीआयमार्फत नागपूर येथे ८ ते १९ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या टी-२० क्रिकेट स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या अनुजा पाटील हिची महाराष्ट्र महिला वरिष्ठ टी-२० संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. येथील शिवाली शिंदे हिचीही संघात निवड झाली. दोघीही अष्टपैलू आहेत.