कडगाव : पाटगांव मध्यम प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून मौनी सागर जलाशयाच्या पाण्याची पातळीत सातत्याने वाढ होत आहे. पाटगाव धरण क्षेत्रातील मुसळधार पावसाने धरणात 46 टक्के पाणीसाठा झाला आहे तर कोंडूशी लघुप्रकल्प 100 टक्के भरले आहे.
भुदरगड तालुक्यात फये, कोंडूशी, मेघोली हे तीन लघुप्रकल्प असून यापैकी कोंडूशी पूर्ण क्षमतेने भरले आहे. सांडव्यातून पाणी मोठया प्रमाणात विसर्ग होत आहे. पाटगांव परिसराला गेले दोन दिवस मुसळधार पावसाने झोडपून काढले असून पाटगांव परिसरातील ओढे-नाले तुडूंब भरून वहात आहेत .
गेल्या चोवीस तासात पाटगांव धरण परिसरात सुमारे 90 मिली मीटर पावसाची नोंद झाली. आज अखेर 1 हजार 990 मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पाटगांव मौनी सागर जलाशयातील पाणीसाठा 47.29 द.ल.घ.मी. एवढा झाला असून कोंडूशी लघुप्रकल्पामध्ये 89 एम. सी. एफ. टी. साठा झाला आहे. उर्वरीत फये लघुप्रकल्प 8.16 टक्के, मेघोली 30 टक्के पाणी साठा झाला आहे.
दृष्टिक्षेप
- गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस
- पाटगाव धरण 46 टक्के भरले
- चोवीस तासात 90 मि.मी. पावसाचे नोंद
- आजअखेर एक हजार 990 मि.मी. पाऊस
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.