Kushna River Committee : आलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाविरोधात कृष्णा महापूर समिती व ‘आंदोलन अंकुश’च्या कार्यकर्त्यांनी तसेच प्रकल्पग्रस्त नागरिकांनी दिल्लीतील विविध विभागांकडे साडेतीन हजारांवर हरकती नोंदवल्या आहेत. आता पुढचा टप्पा सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार आहे. ही माहिती आज कृष्णा महापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीने देण्यात आली.