
CM Devendra Fadanvis : ‘प्राडा’ या आंतरराष्ट्रीय ब्रँडने त्यांच्या मिलान येथील प्रदर्शनात कोल्हापुरी चप्पल सादर केले. मात्र, त्याचे कोणतेही श्रेय कोल्हापूरच्या कारागिरांना दिले नाही. ‘प्राडा’ने या चप्पलला कोल्हापूरचे नाव द्यावे आणि येथील कारागिरांना त्याची रॉयल्टी द्यावी,’ अशी मागणी कृष्णराज महाडिक यांनी केली आहे. आपल्या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले. याबाबतचा व्हिडीओ कृष्णराज यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.