‘कुंभी-कासारी' साखर कारखान्याला उच्चांकी FRP देणार; नरकेंचे आवाहन

कुडित्रे: येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपनपूजन संचालक विलास पाटील व पत्नी कल्पना यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके. शेजारी उपाध्यक्ष निवास वातकर आदी.
कुडित्रे: येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपनपूजन संचालक विलास पाटील व पत्नी कल्पना यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके. शेजारी उपाध्यक्ष निवास वातकर आदी. sakal

कसबा बीड (कोल्हापूर) : ‘कुंभी-कासारी सहकारी साखर कारखाना जिल्ह्यातील उच्चांकी प्रति टन ३०४५ रुपये एकरकमी एफआरपी देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी जाहीर केले. येणााऱ्या हंगामात साडेसहा लाख टनाचे उद्दिष्ट असून, ऊस उत्पादकांनी संपूर्ण ऊस कारखान्यास द्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले. कारखान्याचा ५९ वा बॉयलर प्रदीपन कार्यक्रमप्रसंगी नरके बोलत होते. संचालक विलास पाटील व त्यांच्या पत्नी कल्पना यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन कार्यक्रम पार पडला. उपाध्यक्ष निवास वातकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

नरके म्हणाले, ‘स्व. डी. सी. नरके यांनी घालून दिलेल्या शेतकरी व कामगारांचे कल्याण या विचाराने कारखान्याची वाटचाल सुरू आहे. यंदाच्या हंगामात तोडणीचे दर व कामगार पगार वाढले आहेत, तरीही शासनाच्या सर्व योजना दिल्या आहेत. यावर्षी ही भारतात अतिरिक्त साखरेचे संकट जाणवेल. त्यामुळे इथेनॉलनिर्मितीला वाव आहे. साखर उद्योगाला सावरण्यासाठी साखरेचा हमीभाव ३६ रुपये करावा. चालू वर्षी ६ हजार ८७ हेक्टर लागण व ४ हजार ९०९ हेक्टर खोडवा उसाची नोंद आहे.’

कुडित्रे: येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्निप्रदीपनपूजन संचालक विलास पाटील व पत्नी कल्पना यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्ष चंद्रदीप नरके. शेजारी उपाध्यक्ष निवास वातकर आदी.
तलवार घेऊन फिल्मी स्टाईलने तिघांनी केला पाठलाग ; तरूण गंभीर जखमी


यावेळी संचालक ॲड. बाजीराव शेलार, उत्तमराव वरुटे, आनंदराव पाटील, दादासाहेब लाड, पी. के. पाटील, पी. डी. पाटील, किशोर पाटील, संजय पाटील, भगवान पाटील, जयसिंग पाटील, आनंदराव माने, आबा पाटील, दिलीप गोसावी, माधुरी पाटील, अनिता पाटील, कार्यकारी संचालक अशोक पाटील, सचिव प्रशांत पाटील, चीफ इंजिनिअर संजय पाटील, चीफ केमिस्ट प्रकाश पाटील, शेती अधिकारी संजय साळवी, चीफ अकौंटन्ट अनिल यादव आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com