
BJP Kolhapur District President : भाजप महानगर जिल्हाध्यक्षांची निवड नुकतीच झाली. यावरून भाजपमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक गटांत सुप्त संघर्ष सुरू असल्याचे दिसून येते. खासदार महाडिक यांनी अध्यक्षपदासाठी माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांचे नाव सुचवले होते, तर मंत्री पाटील विजय जाधव यांच्या नावावर ठाम होते. यामध्ये मंत्री पाटील यांची सरशी झाली. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हा अंतर्गत संघर्ष समोर आला आहे.