कोल्हापूर: सकाळी सातला घरातून बाहेर पडलेल्या बाळू हुंबेंनी चार ठिकाणचे माळी काम संपवले. दुपारी पावणेबाराच्या सुमारास वूडलॅंड हॉटेलशेजारील अरुणा चव्हाण यांच्या बंगल्याचे गेट उघडून आत प्रवेश केला. .पिशवीतून साहित्य काढून गवत काढण्यास सुरुवात करणार तोच पाठीमागून बिबट्याने त्यांच्या अंगावर उडी घेतली. उजवा दंड बिबट्याच्या तोंडातून सोडवत त्यांनी आरडाओरडा सुरू केला. बिबट्याचा दात दंडात रुतल्याने रक्त थांबण्याचे नाव घेईना. .Kolhapur Leopard: खुरपं धुतलं... मागे फिरतोय तवर गळ्यावर झडप! बिबट्याच्या हल्ल्यात माळी तुकाराम खोंदल यांचा थरकाप उडवणारा अनुभव.त्यांना लाईन बाझार सेवा रुग्णालयात नेण्यात आले. पत्नी बनाबाई हातातील काम सोडून बाळू हुंबे यांच्याजवळ पोहोचल्या. ‘आयुष्याची दोरी बळकट होती’ असे म्हणत बनाबाईंनी देवाचे आभार मानले..साठ वर्षीय हुंबे कदमवाडीत राहण्यास आहेत. दररोज सकाळी माळी कामानिमित्त ते घराबाहेर पडतात. आजही ताराबाई पार्क परिसरातील चार कामे त्यांनी संपविली. अकराच्या सुमारास पत्नी बनाबाई हुंबे यांना भेटून पुढील कामास जातो, असे सांगून ते निघाले. पावणेबाराच्या सुमारास वूडलॅंड हॉटेलशेजारील अरुणा चव्हाण यांच्या आऊट हाऊस बंगल्यात आले. .Kolhapur Leopard Kills Bull : कोल्हापुरात बिबट्या सत्र काही संपत नाही, गगनबावड्यात बिबट्याने बैलाला केलं ठार; घटना सीसीटीव्हीत कैद.बंगल्याच्या बागेमधील गवत कापण्यास सुरुवातच केली होती, तेवढ्यात बाजूने बिबट्या त्यांच्याजवळ आला. पाण्याची बाटली घेण्यासाठी हुंबे खाली वाकले असतानाच बिबट्याने त्यांच्या अंगावर उडी घेतली. उजव्या दंडाचा चावा घेत बिबट्याने त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला; पण ताकद पणाला लावून त्यांनी हात सोडवून घेतला..आरडाओरडा सुरू केल्याने बिथरलेला बिबट्या उडी मारून वूडलॅंड हॉटेलमध्ये शिरला. तेवढ्यात मालकीणबाई धावत आल्या, असा अनुभव बिबट्याच्या हल्ल्यातील पहिलेच लक्ष्य ठरलेल्या बाळू हुंबे यांनी सांगितला..कुटुंबीयांचा थरकाप...हुंबे यांच्यावर हल्ल्याची माहिती समजताच कुटुंबीयांचा थरकाप उडाला. तसेच बंगला मालक अरुणा चव्हाण, माया चव्हाण यांनीही त्यांना तातडीने उपचारासाठी सेवा रुग्णालयात दाखल केले. उजव्या हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने उपचार सुरू करण्यात आले. हुंबे यांनी घडलेला प्रकार सांगताच रुग्णालयात आलेल्यांचीही भंबेरी उडाली. .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.