कोल्हापूर: दुपारी बाराला हॉटेलच्या लॉनचे काम आटपले. खुरपं धुऊन जागेवर ठेवलं. पाण्याची बाटली भरून पुढच्या कामाला जायची लगबग सुरू होती. किचनमधून एकाने आवाज टाकला ‘तुका मागे बघ’..वळतोय तवर थेट बिबट्याने गळ्याला पकडायचा प्रयत्न केला. हनुवटीला पकडलेल्या बिबट्याला दोन बुक्क्या हाणल्या. माझा दंड धरला, पोटावर, पाठीवर पंजे मारले; पण मी प्रतिकार करत राहिलो. .Kolhapur leopard : कोल्हापूरात बिबट्याचा थरार! दोन तासांच्या मोहिमेनंतर अखेर जेरबंद.ही झटापट पाहून हॉटेलमधले काही जण पळत माझ्याकडे येताच बिबट्या मोठ्या कंपाऊंडवरून उडी मारून पळाला. बिबट्याच्या हल्ल्यातील जखमी तुकाराम सिद्धू खोंदल (वय ४४, रा. कदमवाडी) यांचा हा अनुभव थरकाप उडविणारा होता..तुकाराम खोंदल हे माळी काम करतात. हॉटेल वुडलॅंडमध्ये मागील तीन वर्षांपासून ते माळी काम करतात. आज सकाळी नऊ वाजता नेहमीप्रमाणे ते कामावर आले. माळीकाम आटोपल्यानंतर पावणेबाराच्या सुमारास हातपाय धुऊन, साहित्य बाजूला ठेवले. हॉटेलच्या मागील लॉनमध्ये पाण्याची बाटली भरत असतानाच पाठीमागून बिबट्या अगदी जवळ आला. तुकाराम खोंदल मागे वळताच बिबट्याने त्यांच्या अंगावर झडप टाकली..Kolhapur Leopard: हातात केवळ काठी… तरीही भिडलो बिबट्याशी! पोलिसाचा थरारक सामना कोल्हापूरमध्ये.बिबट्याने तुकाराम यांचा गळा पकडण्याचा प्रयत्न केला. झटापटीत त्याचे दात तुकाराम यांच्या हनुवटीत घुसले. तुकाराम यांचा प्रतिकार सुरू असल्याने बिबट्याने दंडाचा चावा घेतला. झटापटीत तुकाराम यांच्या पोटाला, पाठीला, मनगटावर बिबट्याची नखे खोलवर घुसली होती. .हॉटेलच्या किचन विभागातील काहींनी आरडाओरडा सुरू करताच बिबट्या पाठीमागील कंपाऊंडवरून उडी मारून महावितरणच्या कार्यालयाकडे पळाला. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले..‘पप्पा, तुम्ही कामावर जायचं नाही ’खोंदल हे कदमवाडीत पत्नी व चार मुलींसह राहण्यास आहेत. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या मुली सारिका, दीपाली, प्रियांका सीपीआर रुग्णालयात दाखल झाल्या. वडिलांना झालेल्या जखमी पाहून मुलींना रडू कोसळले. वडिलांनी त्यांना सावरल; पण चौघांचेही डोळे पाणावले. ‘पप्पा, उद्यापासून तुम्ही कामाला जायचं नाही, आम्ही आहे आता,’ असे बोलत मुली वडिलांना बिलगल्या..तुकाराम यांना गंभीर जखमीतुकाराम यांच्या हनुवटीवर व दंडावर बिबट्याचे दात घुसले आहेत. पोटावर, उजव्या दंडावर, पाठीवर नखे लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अंगावर आठ ते दहा ठिकाणी नखांचे व्रण तर सहा दात खोलवर रुतले आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.