
अन् उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला; बिबट्या मादीने नेले पिल्लास
वाटेगांव: वाळवा येथील पश्चिम भागातील खोरी मळ्यात शिवाजी शंकर गावडे यांच्या शेतात बिबट मादीने जन्म दिलेल्या पिल्याला रात्रीच उचलून न्हेल्याचा प्रकार वनविभागाने लावलेल्या सीसीटीव्हीत(cctv)कैद झाला.त्यामुळे गावडे यांच्यासह ऊसतोड मजुरांनी व प्राणी मित्रांनी सुटकेचा निश्वास सोडला .
वाटेगांव ता.वाळवा येथील शिवाजी गावडे यांच्या गट नंबर .९०५ या ऊसाच्या शेतामध्ये मंगळवारी दुपारी ऊस तोडणी मजुरांना बिबट मादी व बछडा दिसल्याने ऊसतोड थांबवली.यावेळी ऊस पेटवणे, किंवा बिबट्याला हाकलून लावणे असा विचार काहींनी व्यक्त केला.परंतु येथील वनविभाग अधिकारी व प्राणी मित्रांनी येथील लोकांचे प्रबोधन केले.सायंकाळी वन विभागास कळविताच घटनास्थळी सुरेश चरापले वनपाल इस्लामपूर ,वनरक्षक अमोल साठे व वनमजूर यांनी जावून ऊस तोड मजूर व ग्रामस्थ यांना मार्गदर्शन व जनजागृती करुन बिबट वन्यप्राण्यापासुन स्वरंक्षण बाबत मागदर्शन केले.
हेही वाचा: कोल्हापूर - सतेज पाटील यांना कोरोनाची लागण
संबधित ठिकाणी १ बिबट मादी व बछडा असल्याची खात्री झाली.त्यांनतर वनविभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मादी व बछड्याची भेट घडुन आणण्याची व्यवस्था करुन रात्री ट्रॅप कॅमेरे लावले. रात्री सुमारे ९ वाजता बिबट मादीने ऊस शेतात प्रवेश करीत बछड्याला अलगद उचलून घेवून जातानाचे चलचित्र वनविभागाच्या ट्रॅप कॅमेरात कैद झाले.या घटनेनंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला . सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक विजय माने सहाय्यक वनसंरक्षक डॉ.अजित साजणे , वनक्षेत्रपाल श्री .सचिन जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कार्यवाही करण्यात आली. शिराळा वनपरिक्षेत्रातील वनअधिकारी व कर्मचारी यांनी कामगिरी बजावली .याबाबत शिराळा वनक्षेत्रपाल सचिन शं .जाधव यांनी माहिती दिली.
बिबट्याचा बंदोबस्त कधी व कसा होणार?
वाळवा तालुक्यात बिबट्या चा अधिवासाबरोबरच पिल्ल्याचे जन्म व त्यांची ऊसशेतात होणारी वाढ मानवी जीवनास धोक्याचे संकेत आहेत.त्यामुळे नेमके किती बिबट प्राणी आहेत व त्यांचा बंदोबस्त कसा होणार याचे उत्तर वनविभागाकडे नाही.
Web Title: Leopard Kids Mother Female Leopard
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..