

Panic in Pune Over Alleged Leopard Police Investigation Reveals It Was a Monkey
Esakal
पुण्यात औंध परिसरात बिबट्या दिसल्याच्या प्रकारानंतर आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. यानंतर आता गणेशखिंड रस्त्यावर पॉलिटेक्निक कॉलेज परिसरात बिबट्या असल्याचा कॉल पोलिसांना आला. मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलांनी हा फोन केला होता. पोलिसांनी जेव्हा तिथं जाऊन पाहणी केली असता बिबट्या नाही तर वानर असल्याचं आढळलंय. यानंतर सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला.