Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Shinganapur Road Leopard : कोल्हापूरच्या वेशीवर शिंगणापूर मार्गावर पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले आहे. घटनेनंतर वनविभागाकडून बिबट्याचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे.
Kolhapur Leopard Sighting

Kolhapur Leopard Sighting

esakal

Updated on: 

Leopard Spotted in Kolhapur : कोल्हापूर शहरालगतच्या शिंगणापूर मुख्य मार्गावरील खांडसरी नाका परिसरात एका तरुणाला बिबट्याचे दर्शन झाल्याची घटना समोर आली आहे. तसेच दत्तनगरमधील काही महिलांनी पहाटे चंबुखडी टाकी परिसरात बिबट्या दिसल्याचा दावा केला आहे. या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वनविभागाने बिबट्याच्या शोधासाठी मोहीम हाती घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com