
Nandani Elephant Controversy : नांदणी येथील जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ संस्थानच्या ‘महादेवी’ हत्तीणीला गुजरातच्या जामनगर येथील वनतारा हत्ती संवर्धन केंद्रात पाठवण्यात आले. दरम्यान, हत्तीण नांदणी मठात राहण्यासाठी अनेकांनी सहकार्य केलं. परंतु, पेटा संस्थेने केलेल्या याचिकेचा निकाल मठाच्या विरोधात लागल्याने हत्तीला निरोप देण्यात आला. दरम्यान, तत्कालीन खासदार राजू शेट्टी यांचे २०१८ सालचे हत्तीणीबाबतचे एक पत्र व्हायरल होत आहे. या पत्रामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. यावर सकाळ ऑनलाईनने फॅक्ट चेक केला असून याबाबत शेट्टींनी खुलासा केला.