esakal | Coronavirus : ‘बाळा नक्की येतो' ; मोरोक्कोत अडकलेल्या बापाची साद...
sakal

बोलून बातमी शोधा

liberia to morocco via corona indian tourist kolhapur marathi news

लायबेरिया ते मोरोक्को व्हाया ‘कोरोना’.पाटील, प्रा. कुलकर्णींच्या विचित्र प्रवासाची कथा; विमानतळावर अडकले; व्हिडिओ कॉलद्वारे संवाद...

Coronavirus : ‘बाळा नक्की येतो' ; मोरोक्कोत अडकलेल्या बापाची साद...

sakal_logo
By
सुधाकर काशीद

कोल्हापूर : पश्‍चिम आफ्रिकेत बॉक्‍साईटची खाण असलेला कोल्हापुरातील एक तरुण उद्योजक आणि भूखनिज क्षेत्रातले एक संशोधक असे कोल्हापूरचे दोन जण गेले पाच दिवस उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को विमानतळावरच अडकले आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत आहे. 

पहिले तीन दिवस ते विमानतळाच्या व्हरांडयात आणि दोन दिवस विमानतळावरील एका कक्षात दोघेही बसून आहेत. 
मोरोक्कोत अंग गोठवून टाकणारी थंडी आहे. या दोघांचेही घरच्यांशी व्हिडिओ कॉल सुरू आहेत. आणि मोबाईलच्या छोट्या पडद्यावर आपल्या मुलाबाळांचे होणारे दर्शन त्यांना मोरोक्कोच्या थंडीतही मायेची ऊब मिळवून देत आहे.

 हेही वाचा- जनता कर्फ्यू’वर नियंत्रण ठेवणार ही १४ पथके....

लायबेरिया ते मोरोक्को व्हाया ‘कोराना’
आदित्य अविनाश पाटील (रा. रमण मळा) व प्रा. अनिल कुलकर्णी (रा. आर. के. नगर) या दोघांच्या लायबेरिया ते मोरोक्को व्हाया ‘कोराना’ अशा नको, त्या विचित्र प्रवासाची ही कथा आहे. आदित्य या तरुण उद्योजकाच्या पश्‍चिम आफ्रिकेतील लायबेरियात बॉक्‍साईट, लोखंडाच्या खाणी आहेत. भूखणीज तज्ञ व सायबरच्या नॉन कन्हे वनशियल विभागाचे प्राचार्य अनिल कुलकर्णी या क्षेत्रातले तज्ञ असल्याने दोघे लायबेरियाला गेले होते. उत्खननाची परवानगी व इतर कागदपत्रांची पूर्तता करून ते भारतात येण्यासाठी १६ मार्चला विमानात बसले. मार्गात मोरोक्को येथे विमान बदलायचे होते. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमानतळाचे सगळे वेळापत्रक विस्कळीत झाले.  

 हेही वाचा- तेलनाडे बंधूंचे नगरसेवकपद रद्द...

तीन दिवस  व्हरांडयातच

दोघांनाही मोरक्को विमानतळावरच थांबून ठेवले गेले. आज नाहीतर उद्या पुढचे विमान मिळेल म्हणून दोघेही पहिल्या दिवशी तसे फार काळजीत नव्हते. पण नंतर मोठी गडबड असल्याचे त्यांच्या ध्यानात आले. १६ ते १९ मार्च असे तीन दिवस त्यांनी विमानतळाच्या  व्हरांडयातच दिवस काढले. प्रा. कुलकर्णी यांनी मोरोक्कोतील भारतीय दूतावासाशी कसाबसा संपर्क साधला. आणि भारतीय दूतावासाने पहिल्यांदा त्यांना विमानतळाच्या व्हरांड्यातून विमानतळावरच्या एका कक्षातच राहण्याची सोय केली.

 हेही वाचा- खुशखबर : पहिली ते आठवीचे विद्यार्थी डायरेक्ट पुढच्या वर्गात...

३५ प्रवासी  विमानतळावर अडकले

रोज चहा नाश्‍ता दोन वेळा जेवण मिळेल अशा सुविधा त्यांना दिल्या गेल्या. आता हे दोघे आणि इतर विविध देशातील प्रवासी असे अवधे ३५ जणच मोरॉक्को विमानतळावर आहेत. तेथे जी सुविधा मिळते या परिस्थितीत त्यांच्यादृष्टीने फाइव्हस्टारच आहे. मोरोक्कोत गोठवणारी थंडी आहे. दिवसभर विमानतळाच्या  काचेतून समोर थांबलेली विमानेच ती काय त्यांच्या नजरेस पडतात. विमानतळावरून बाहेर पडण्यास त्यांना पूर्ण मज्जाव आहे. अशा परिस्थितीत मोबाईल वरचा व्हाट्‌सअप कॉल त्यांना आधार ठरला आहे.

हेही वाचा- Coronavirus : रविवारी जनता कर्फ्यू  : काय सुरू; काय बंद राहणार... वाचा

व्हाट्‌सअपकॉल चा आधार
आदित्य रमणमळा येथील घरी आई-वडील पत्नी प्रज्ञा, मुले युगवीर, युगंधरा यांच्याशी व कुलकर्णी यांच्या पत्नी प्रतिभा, कन्या स्नेहा व श्रद्धा यांच्याशी व्हाट्‌सअपकॉल वर बोलतात. बोलण्यापेक्षा जास्त काळ ते  डबडबलेल्या डोळ्यांनी एकमेकाला पाहतात. मुलं म्हणतात ‘पप्पा लवकर या‘ हे दोघेही म्हणतात ‘बाळा नक्की येतो‘ पण आणखी किमान अर्धा दिवस तरी विमान वाहतूक सुरू होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे आदित्य व प्रा.कुलकर्णी यांचा कधीही कल्पनाही न केलेला मुक्काम विमानतळावरच असणार आहे.

भारतीय दूतावास म्हणजे काय हे समजले

भारतीय दूतावास म्हणजे काय ताकद असते, हे आम्ही अनुभवले. या दूतावासामुळेच आम्हाला मोठा आधार मिळाला आहे. याशिवाय, भारतातून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार धनंजय महाडिक, ‘सायबर’चे आर. ए. शिंदे यांचे आम्हाला भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-आदित्य पाटील, प्रा अनिल कुलकर्णी.