
Kolhapur Liquor Seized
esakal
एक कोटींची दारू जप्त – शाहूवाडी तालुक्यातील वारुळ येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कारवाईत गोवा बनावटीची सुमारे ₹1.04 कोटींची दारू जप्त करण्यात आली.
चालक ताब्यात, मालकावर गुन्हा – चालक संतोष बंडू पेटकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ट्रक मालक प्रल्हाद लिंबा धनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची कारवाई – पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने 1380 बॉक्ससह दारू आणि ट्रक जप्त केला.
Kolhapur Police : गोवा बनावटीच्या दारूची महाराष्ट्रात वाहतूक व विक्री करण्यासाठी बंदी असतानाही सुमारे एक कोटी दारूची वाहतूक रोखून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने वारुळ (ता. शाहूवाडी) येथे कारवाई केली. संतोष बंडू पेटकर (वय ४५, रा. शिराळा नाका, इस्लामपूर, जि. सांगली) असे चालकाचे नाव असून ट्रक मालक प्रल्हाद लिंबा धनगर (रा. शिरपूर, जि. धुळे) याच्यावर शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.