
Kolhapur Crime news
esakal
सावकारांच्या तगाद्याला कंटाळून संपवलं जीवन :
कोल्हापूरमधील गजानन महाराजनगर येथील अभिजित लाड (३७) यांनी हॉस्पिटलमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने सावकारांकडून घेतलेल्या हातउसण्या पैशांबाबत तगादा सुरू असल्याचे चिठ्ठीतून उघड झाले.
घटनास्थळ व पोलिसांची कारवाई:
पाच बंगला परिसरातील हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार असलेल्या लाड यांनी काम संपल्यावर आत्महत्या केली. शाहूपुरी पोलिसांनी मृतदेह उतरवून सीपीआर रुग्णालयात नेला व पुढील तपास सुरू केला.
नातेवाईकांची मागणी:
मृतदेहाजवळ आढळलेल्या दोन पानी चिठ्ठीतून कारण स्पष्ट झाल्याचे सांगत, नातेवाईकांनी संशयितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. लाड यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
Hospital Worker End Life Kolhapur : सावकारांच्या त्रासाला कंटाळून सफाई कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला. अभिजित बाबू लाड (वय ३७, रा. गजानन महाराजनगर, संभाजीनगर) असे मृताचे नाव आहे. तो पाच बंगला परिसरातील हॉस्पिटलमध्ये सफाई कामासाठी होता. काम संपवून त्याने तिथेच गळफास घेतला. हातउसणे घेतलेल्या पैशांबाबत तगादा सुरू असल्याचे मृतदेहाजवळ मिळून आलेल्या चिठ्ठीतून समोर आले. सावकाराला कंटाळूनच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.