Lok Sabha 2024 : लॅपटॉप, पेनड्राईव्हला निवडणुकीत चिन्हाचा बहुमान

Lok Sabha 2024 : काळाच्या ओघात निवडणुकीची चिन्हेही बदलत गेली. या वर्षी होणाऱ्या चिन्हांच्या यादीमध्ये आता लॅपटॉप, संगणक, हेडफोन अशी विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचाही समावेश केला आहे.
Lok Sabha 2024
Lok Sabha 2024esakal

Lok Sabha 2024 : काळाच्या ओघात निवडणुकीची चिन्हेही बदलत गेली. या वर्षी होणाऱ्या चिन्हांच्या यादीमध्ये आता लॅपटॉप, संगणक, हेडफोन अशी विविध प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचाही समावेश केला आहे. त्याचबरोबर पारंपारिक चिन्हांचाही समावेश आहे. या चिन्हांच्या यादीकडे लक्ष दिल्यास बदलत गेलेल्या काळाची प्रचिती येते.

निवडणुक कोणतीही असो चिन्ह हीच पक्षाची आणि उमेदवाराची ओळख असते. त्यामुळे राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार हे चिन्हाच्या बाबतीत आग्रही असतात. लोकांच्या मनात बसणारे, मतदारांना आकर्षित करणारे आणि विजयाचे किंवा जनमानसाचे प्रतीक असणारे चिन्ह असावे अशी प्रत्येक उमेदवाराची इच्छा असते. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षाची चिन्हे निश्चित झालेली असतात. त्यामुळे त्यांच्यावर अन्य कोणाला अधिकार सांगता येत नाही.

Lok Sabha 2024
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात उमेदवारांपेक्षा नेत्यांचीच कसोटी; कसं आहे निवडणुकीचं चित्र?

तसेच त्या चिन्हाचा उपयोगही करता येत नाही. त्यामुळे अपक्ष उमेदवारांना चिन्ह देण्यासाठी विविध प्रकारच्या वस्तू, उपकरणे, फळे, फुले यांचा उपयोग केला जातो. पूर्वी कुकर, शिट्टी, नांगर, कपाट, कपबशी, आंगठी या चिन्हांना अपक्ष उमेदवारांकडून मागणी असायची. तलवार, त्रिशूळ अशीही चिन्हे होती. त्यानंतर टीव्ही, प्रीज, कुकर, मिक्सर, लायटर, ओव्हन, इस्त्री अशी घरातील उपकरणे चिन्हांमध्ये दिसू लागली.

काही काळानंतर रोल असणारा कॅमेरा, दुचाकी, चारचाकी ही चिन्हे उमेदवारांच्या आकर्षणाचा विषय होता. मात्र, गेल्या दोन दशकात देशात तंत्रज्ञानाची क्रांतीच झाली आहे. त्यामुळे काही इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या आपल्या जीवनाच्या अविभाज्य घटक बनल्या आहेत. एवढेच नव्हे तर त्या वस्तू, उपकरणे आता निवडणूक चिन्हांच्या यादीतही समाविष्ट झाल्या आहेत.

यामध्ये लॅपटॉप, संगणक, पेनड्राईवह, मोबाईल चार्जर, हेडफोन, संगणकाचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा ही चिन्हे अपक्ष उमेदवारांना देण्यात येणार आहे. बदलत्या काळानुसार आता निवडणूक चिन्हही बदलत आहेत.

Lok Sabha 2024
Lok Sabha Poll : नागपुरात २६ तर रामटेकमध्ये २८ उमेदवार; ४२ लाख ७२ हजार मतदार बजावणार हक्क

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com