
Mahadevi Elephant : नांदणी (ता. शिरोळ) येथील ‘महादेवी हत्तीणी’ला मठामध्ये परत करण्यासाठी राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करूनही सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नाही. याबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिली.