Madhuri elephant homecoming to Nandani Math
esakal
जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : स्वस्तिश्री जिनसेन महास्वामी मठाकडे माधुरी हत्तीण परत आणण्यासाठी नांदणी (ता. शिरोळ) येथे सुविधा उपलब्ध केल्या (Madhuri elephant Nandani Math latest update) आहेत. याची रविवारी (ता. ९) सायंकाळी उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीचे सदस्य, सेंट्रल झूचे सदस्य, वनविभागाचे प्रतिनिधी यांची संयुक्त समितीकडून पाहणी करण्यात आली.