
Nandani Math Kolhapur : नांदणी (ता. शिरोळ) येथील स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मठाच्या ‘महादेवी हत्तीण’ प्रकरणी आज (ता. २८) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. मठांतर्गत येणाऱ्या ८६५ गावांचे सुनवणीकडे लक्ष लागले होते. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने मठाची याचीका फेटाळून लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या जो आदेश आहे तो कायम राहिल असे सांगण्यात आले.