
Nandani Elephant : नांदणी येथील हत्तीण परत मिळवण्यासाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले. या शिष्टमंडळात रजनीताई मगदूम, सुरेखा पाटील, उज्ज्वला पाटील, स्मिता पाटील, प्रज्ञा पाटील, माधुरी चौगुले, मनीषा पाटील, आक्काताई डुंब, इंदिरा पाटील, कल्पना दुधाळे, सुवर्णा अपराज, सुप्रिया सावंत, बिल्किस सय्यद, श्रद्धा अलमल यांचा समावेश होता. त्याबरोबर जैन स्वामी आणि अन्य पंथांचे स्वामीदेखील सहभागी झाले होते.
या दरम्यान खासदार धैर्यशील माने आणि आमदार अशोकराव माने, माजी आमदार प्रकाश आवाडे थेट मोर्चात सहभागी झाले यावेळी त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ आली. यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश होता.