esakal | महाविकास आघाडीच्या बंदला कोल्हापुरात 'भगवी रॅली' काढत शिवसेनेचा सहभाग ; Maharashtra Bandh
sakal

बोलून बातमी शोधा

kolhapur

महाविकास आघाडीच्या बंदला 'भगवी रॅली' काढत शिवसेनेचा सहभाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदमध्ये (Maharashtra Bandh) व्यापाऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी शिवसेनेने (Shiv Sena Bicycle Rally) आज मोटारसायकल रॅली काढली. हाती भगवे झेंडे तसेच केंद्र सरकारचा निषेध करत निघालेल्या रॅलीत शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

दुपारी पावणेबाराच्या सुमारास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानापासून रॅलीस सुरवात झाली. प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांनी रॅलीसंबंधी माहिती दिली. उत्तर प्रदेश मधील लखीमपुर येथे दुर्देवी घटना घडली. जो बळीराजा देशाचा अन्नदाता आहे त्यालाचा चिरडून मारण्याचा प्रयत्न असेल तर ही बाब योग्य नाही. घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने बंद पुकारला आहे. त्यात शिवसेनाही सहभागी होत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शनिवार पेठ, बुधवार पेठ, शहराच्या जुन्या भागातून रॅलीने मार्गक्रमण केले. प्रमुख रस्त्यावर दुकाने उघडी होती त्यांना बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या गेल्या. बिंदु चौक, लक्ष्मीपुरी, उमा चित्रमंदिर, बागल चौक, स्टेशन रोड, राजारामपुरी, शाहूपूरी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीची सांगता झाली.

हेही वाचा: अजित पवार हुशार राजकारणी; चंद्रकांत पाटलांचा खोचक टोला

उत्तरचे शहरप्रमुख जयवंत हारूगले, रविकिरण इंगवले, नंदकुमार मोरे, सुनील जाधव, अरूण सावंत. सुशील भांदिगरे, किशोर घाटगे. सनी अतिग्रे, नीलेश हंकारे. रमेश खाडे, महेश उत्तुरे, राजू हुंबे, रघुनाथ टिपुगडे, दिपक चव्हाण. ॲड. चेतन शिंदे, पियूष चव्हाण, यौगेश चौगुले, विश्‍वजित साळोखे आदि सहभागी झाले.

loading image
go to top