
दृष्टिक्षेपात
पर्याय शोधण्याचे ‘एमएसआरडीसी’ला आदेश
पवनार ते पत्रादेवी मार्गाचे काम सुरू करण्यास शासकीय मान्यता
फडणवीस सरकारचा संघर्ष समितीकडून निषेध
Shaktipeeth Highway News : पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरू करण्यास सरकारने आज मान्यता दिली आहे. त्याचबरोबर या मार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळल्याचा स्थगिती आदेश रद्द केला आहे. त्यामुळे हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारच, यावर शिक्कामोर्तब झाले. तसेच शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणीचे सर्व पर्याय तपासावेत, असे आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत. या निर्णयाविरोधात जिल्ह्यात शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने महायुती सरकारचा निषेध केला आहे.