
Maharashtra Governments
esakal
सलोखा योजनेला कमी प्रतिसाद: शेतजमिनींचे तंटे निकाली काढण्यासाठी राज्य सरकारची ‘सलोखा’ योजना असूनही, कोल्हापूर जिल्ह्यात दोन वर्षांत केवळ १२ प्रकरणेच मार्गी लागली आहेत.
तंट्यांची संख्या प्रचंड: बांध, मालकीहक्क, अतिक्रमण, वाटणी, मोजणी यांसारखे हजारो वाद जिल्ह्यात व राज्यभर प्रलंबित आहेत; पण योजनाविषयी माहिती तळागाळापर्यंत पोहोचली नाही.
अंमलबजावणीत ढिलाई: महसूल व मुद्रांक शुल्क विभाग, प्रांताधिकारी, तलाठी, मंडल अधिकारी व तंटामुक्ती समित्यांची जबाबदारी असूनही बहुतांश ठिकाणी केवळ कागदी हालचाली सुरू आहेत; त्यामुळे योजनाचे उद्दिष्ट साध्य झाले नाही.
Kolhapur Farmers : प्रवीण देसाई : शेतजमिनींचे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले तंटे निकाली काढण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या सलोखा योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. दोन वर्षांत जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच दस्त होऊन प्रकरणे मार्गी लागली आहेत. ही योजना अतिशय चांगली असून ती तळागाळापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. यासाठी प्रशासनस्तरावरून आणखी गतिमान पद्धतीने प्रयत्न व्हावेत, हीच अपेक्षा आहे. या योजनेचा लेखाजोखा मांडणारी वृत्तमालिका आजपासून ....