Maharashtra heavy rain forecast today
esakal
कोल्हापूर : माॅन्सून पुन्हा सक्रिय झाला असून, दुपारी तीननंतर जिल्ह्याच्या सर्व भागांत पावसाचे पुनरागमन (Maharashtra monsoon rain update) झाले. धरणक्षेत्रातही जोरदार पावसाला प्रारंभ झाला. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. पुढील पाच दिवस दमदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, काल शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.