Maharashtra Rain Update : पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे; कोल्हापूरला पुराचा धोका

राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा
Panchganga River
Panchganga River Sakal

Mharashtra Rain Update : राज्यात काही दिवसांपूर्वी उसंत घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली असून, राज्यातील अनेक भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. यामुळे अनेक ठिकाणचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर, दुसरीकडे येत्या 24 तासांत राज्यातील विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला असून, कोल्हापूर येथील पंचगंगेची पाणी पातळी धोक्याच्या पातळीकडे वाटचाल करत आहे.

Panchganga River
राज्य सरकारने निर्णय बदलताच महापालिकेला 25 लाखांचा भुर्दंड

आज सकाळी 5.30 च्या सुमारास स्वयंचलित दरवाजा क्रमांक 6 उघडण्यात आला असून, यातून 1428 आणि पावर हाऊसमधून 1600 असा एकूण 3028 क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पंचगंगेतील वाढत्या पाणीपातळीमुळे कोल्हापूरला पुराचा विळखा बसण्याची शक्यता वर्तवली जात असून, सकाळी सातच्या सुमारास पंचगंगेची पाणी पातळी 40 फुटांवर पोहचली आहे. यामुळे 71 बंधारे पाण्याखाली गेले असून, नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराच्या सूचना देण्यात आला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार पुढचे दोन ते तीन 3 दिवस राज्यात पाऊस सक्रीय राहणार आहे. यामध्ये पालघर, दक्षिण कोकण, पुणे आणि पूर्व विदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबई ठाणे, मध्य महाराष्ट्र व विदर्भ काही भाग ऑरेंज‌ अलर्ट देण्यात आला आहे. तर सांगलीतही कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

Panchganga River
फडणवीसांकडे पुणे-सोलापूरची जबाबदारी? शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील नॉट रिचेबल

विदर्भात अतिवृष्टीचा धोका

गडचिरोली,भंडारा जिल्ह्यांसह विदर्भात अनेक ठिकाणी संततधार पाऊस सुरुच आहे. तर काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा कायम आहे. संभाव्य धोका टाळण्यासाठी भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना बुधवार सुट्टी जाहीर केली आहे. गेल्या २४ तासांत पुरात वाहून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात यवतमाळ तालुक्यातील एक, बाभूळगाव दोन, पुसद एक व राळेगाव तालुक्यातील तीन व पुसद तालुक्यातील माळपठारावरील अडगाव येथील एका नागरिकाचा समावेश आहे. बोरी अरब येथील अडाण नदीवर असलेल्या पुलावर पाणी असल्याने दोन दिवसांपासून दारव्हा-यवतमाळ मार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे.

Panchganga River
औरंगाबाद : आता तरी जिल्ह्याला अच्छे दिन येणार का ;इम्तियाज जलील

कोकणात मुसळधार पाऊस

कोकणात विविध ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत असून सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत. मंगळवारी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली असून, लांजामध्ये 330 मिमी, मंडणगडमध्ये 170 मिमी, देवरुख 140 मिमी, चिपळूण 140 मिमी, रत्नागिरीत 130 मिमी पाऊस, तर रायगडातील ताळामध्ये 210 मिमी, म्हसळात 190 मिमी, माणगावात 160 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे दरवाजे उघडले

सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून, वीरधरणाच्या पाच दरवाजातून 24 हजार 500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. येत्या काळात पावसाचा जोर असाच राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com