ST News: तर एसटी कर्मचारी पुन्हा जाणार राज्यव्यापी संपावर; सरकारची होणार कोंडी?

Maharashtra Latest Update: सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रेटले. एसटीच्या तत्कालीन संघटनांचा प्रभाव या आंदोलनाने कमी केला
ST News: तर एसटी कर्मचारी पुन्हा जाणार राज्यव्यापी संपावर; सरकारची होणार कोंडी?
ST Newssakal
Updated on

Kolhapur News : दीर्घकाळानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत एसटी कर्मचाऱ्यांना सरसकट पाच हजार रुपये वेतन वाढ द्यावी, यासह विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन सुरू केले. मागण्या मान्य न झाल्यास ९ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला.

विलीणीकर मागणीसाठी गुणवंत सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपूर्वी सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. तेव्हा विलीनीकरणाची मागणी चुकीचा असल्याचे सांगण्यात येत होते. विलीनीकरणाऐवजी शासनाने वेतनवाढ दिली. तरीही सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांचे आंदोलन रेटले. एसटीच्या तत्कालीन संघटनांचा प्रभाव या आंदोलनाने कमी केला.

ST News: तर एसटी कर्मचारी पुन्हा जाणार राज्यव्यापी संपावर; सरकारची होणार कोंडी?
ST Employee Salary : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम; निधी देण्यात सरकारची बनवाबनवी

मान्यताप्राप्त संघटनेची मान्यता रद्द झाली. पुढे सदावर्ते यांचे संचालक मंडळ एसटी बॅंकेवर निवडून आले. त्यानंतर बॅंकेचा कारभार वादात सापडला. कर्मचाऱ्यांना सहज मिळणारे कर्ज व ठेवीचे पैसे परत मिळणे मुश्कील झाले. यातच सदावर्ते यांनी नातेवाइकाला बॅंकेच्या उच्चपदावर नियुक्‍त केले. कर्मचाऱ्यांची बनावट भरती केली. त्यातूनही लाभ कमवला असे अनेक आरोप झाले.

विलीनीकरण नाही आणि हक्काच्या बॅंकेतून स्वतः पैसे मिळणेही अडचणीचे झाल्याने एसटी कर्मचारी नाराज झाले. ते सदावर्तेंचे नेतृत्व सोडून पुन्हा संघटनांच्या छायेत आले. सदावर्तेना बाजूला करून एसटी कर्मचाऱ्यांच्या ९ संघटनांनी कर्मचारी हिताच्या मागण्यांसाठी मुंबईत धरणे आंदोलन सुरू केले. ९० हजार कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येकी चार मतदार धरले तरी साडे तीन ते चार लाख मतदारांची नाराजी सत्ताधाऱ्यांना ओढावून घ्यावी लागणार आहे. त्यामुळे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतील.

ST News: तर एसटी कर्मचारी पुन्हा जाणार राज्यव्यापी संपावर; सरकारची होणार कोंडी?
ST Viral Video: एसटीने आडूळला घेतला नाही थांबा, कंटक्टर आणि प्रवाशात झाली हाणामारी , गुन्हा दाखल

अन्यथा, संप झाल्यास राज्यभरातील लाखो प्रवाशांचा प्रवासाला काही काळ ब्रेक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आंदोलनातील मागण्या

पाच हजार रुपये सरसकट वेतनवाढ

स्वतःच्या नवीन बस खरेदी करा

कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरक द्यावा

वाढीव घर भाडे भत्ता, वेतन वाढीचा फरक द्या

वैद्यकीय कॅशलेस विमा लाभ द्यावा

जाचक शिस्त आवेदन कार्यपद्धत रद्द करावी

ST News: तर एसटी कर्मचारी पुन्हा जाणार राज्यव्यापी संपावर; सरकारची होणार कोंडी?
Chiplun ST News : चिपळुणात शहरांतर्गत एसटी वाहतूक सुरू; पहाटे पाचपासून गोवळकोट धक्क्यापर्यंत १६ फेऱ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com