Hasan Mushrif warns about crisis in sugar factories
esakal
Hasan Mushrif raises concern over sugar mill survival: राज्यातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात असून, अनेक साखर कारखाने कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. अशा परिस्थितीत एका साखर कारखानदाराने “आता सामूहिक आत्महत्या करण्याची वेळ आली आहे,” अशी व्यथा मांडल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. आज माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी गोकुळ निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बैठक आणि महायुतीच्या राजकारणावरही भाष्य केलं.