
देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने शेतकरी संकटात
esakal
प्रतिटन २७.५० रुपये कपात – ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून यंदा प्रतिटन २७ रुपये ५० पैसे कपात होणार असून, कोल्हापूर विभागातील शेतकऱ्यांवर ५५ कोटींचा आणि राज्यातील शेतकऱ्यांवर तब्बल ३३० कोटींचा आर्थिक बोजा पडणार आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीत वाढ – आतापर्यंत प्रति टन ५ रुपये कपात केली जात होती, मात्र यंदा ती वाढवून १० रुपये करण्यात आली असून, पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नव्याने ५ रुपयांची कपात होणार आहे.
शेतकऱ्यांची नाराजी – अतिवृष्टी व पुरामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर ही अतिरिक्त कपात अन्यायकारक असल्याची भावना असून, साखर संघाच्या विरोधाला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही.
Devendra Fadnavis Decision : कुंडलिक पाटील : ा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलांमधून कपात होणारी रक्कम वाढली असून, प्रतिटन २७ रुपये ५० पैसे कपात होणार आहेत. यामुळे कोल्हापूर विभागात ५५ कोटी, तर राज्यातून ३३० कोटींचा बोजा ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्यावर पडणार आहे. अतिवृष्टी व पुरामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा अडचणी निर्माण होणार आहेत.