'कायतरी शिजतोय मोठा डाव...'; ST आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ST

जिल्ह्यातील बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कायतरी शिजतोय मोठा डाव...; ST आंदोलनाला विद्यार्थ्यांचा पाठिंबा

कोल्हापूर - एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात विद्यार्थी संघटनांनी सहभाग घेतला आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणी सरकारने मान्य करावी अशा घोषणा देत विद्यार्थांनी आज कोल्हापूरातील मध्यवर्ती बसस्थानकावर जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकार मागणी मान्य करण्यास विलंब करत आहे, याबद्दल तीव्र नाराजीही व्यक्त केली. जिल्ह्यातील बहुतांशी महाविद्यालयीन विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

हेही वाचा: 'ठाकरे सरकारला पाटलाच्या नाही, खानच्या पोराची चिंता'

यावेळी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा. जोपर्यंत निर्णय होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी कर्मचाऱ्यांची धारणा असून सर्व कर्मचारी एकजुटीने या आंदोलनात सहभागी आहेत, अशी माहिती एसटी कर्मचारी प्रतिनिधी उत्तम पाटील यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी फलक घेऊन मोर्चात सहभाग दाखवला. यावेळी फलकावरील लिखावटीने उपस्थितांचे लक्ष मात्र वेधून घेतले होते.

दरम्यान, राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे अंतरिम वेतनवाढ देण्याचा प्रस्ताव या बैठकीत देण्यात आला. त्यावर संपकल्यांच्या प्रतिनिधींनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र यावर आझाद मैदानात आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत बोलल्यानंतरच संप मागे घेण्यावावराना निर्णय घेतला जाईल. सरकारसोबत सकाळी अकरा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरु आहे.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

loading image
go to top