कोल्‍हापुरातील 'महाविकास'चे 19 सदस्य सहलीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

political news

महाडिक कुटुंबातील उमेदवार निश्‍चित करून त्यांनीही जोडण्या करण्यास सुरुवात केली.

कोल्‍हापुरातील 'महाविकास'चे 19 सदस्य सहलीवर

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून अर्ज भरण्याची मुदत संपली. ही निवडणूक महाविकास आघाडीचे पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्यातच होणार असल्याचे स्‍पष्‍ट झाले. निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकासकडून मतदारांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन सुरू आहे. दिवसभरात १९ मतदार सहलीवर रवाना झाले. यात जिल्‍हा परिषदेच्या १५ तर चार नगरसेवकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत १३५ मतदारांना सहलीवर पाठवल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: भाजपच्या पडळकर-देशमुखांना धक्का; तानाजीरावांचा अश्‍वमेध सुटला!

निवडणुकीसाठी येत्या १० डिसेंबरला मतदान होत आहे. एकूण ४१६ मतदार आहेत. २०९ मते घेणारा उमेदवार विजयी होणार आहे. या निवडणुकीत मते फुटण्याचीही परंपरा असल्याने जास्‍तीत जास्‍त मतदारांना सहलीवर पाठवण्याचे नियोजन सुरू आहे. महाविकास आघाडीकडून पालकमंत्री पाटील यांची उमेदवारी निश्‍चित असल्याने त्यांनी पहिल्या दिवसापासून प्रचारात आघाडी ठेवली. प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. एकेका मतदाराच्या किमान तीन वेळा भेटी घेतल्या. भाजपने मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर त्याच्या तयारीला सुरुवात केली.

महाडिक कुटुंबातील उमेदवार निश्‍चित करून त्यांनीही जोडण्या करण्यास सुरुवात केली. मात्र प्रचाराला व गाठीभेटींना कमी वेळ राहिल्याने गटांच्या बैठका घेऊनच सदस्यांना सहलीवर जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. या निवडणुकीत जिल्‍हा परिषद सदस्यांचे सर्वाधिक मतदान आहे. महाविकास आघाडीकडे ६५ पैकी ४३ सदस्य आहेत. यातील बहुतांश सदस्यांना सहलीवर पाठवण्यात येणार आहे. आज यातील १५ सदस्य सहलीवर गेले. पुढील चार दिवसात उर्वरित सदस्यही सहलीवर जाणार आहेत. भाजपचे सदस्य मात्र अजून सहलीवर गेलेले नाहीत. सहलीबाबत कोणत्याही सूचना नसल्याने हे सदस्य नियमितपणे जिल्‍हा परिषदेत उपस्‍थिती लावत आहेत.

हेही वाचा: नेत्यांच्या नातलगांना तिकट देऊन भाजप, कॉंग्रेसचे 20 उमेदवार रिंगणात

loading image
go to top