Kolhapur Municipal corporation Election : “स्वबळावर लढू द्या!” भाजप-शिवसेनेत कार्यकर्त्यांचा जोरदार दबाव; महायुतीचे गणित गुंतागुंतीचे!
Leaders Urge Patience Until Survey Determine : सर्वेक्षणानंतरच स्वबळाचा निर्णय करू, त्यामुळे धीर धरा, असा सल्ला नेत्यांकडून दिला जात आहे. शिवसेनेने शहरातील मातब्बरांचा पक्ष प्रवेश करून घेतला. त्यामुळे आता त्यांच्याकडेही इच्छुकांची संख्या वाढत आहे.
कोल्हापूर : भाजप, शिवसेना (शिंदे गट) यांच्यात महायुतीमध्येच चुरस पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाने स्वबळावर लढावे, असा दबाव कार्यकर्त्यांकडून नेत्यांवर टाकला जात आहे.