GST Raid Kolhapur : कोल्हापुरात जीएसटी विभागाची धाड, तब्बल २१ कोटींचा कर चुकवला; गोपनीय माहिती समोर आली अन्

Major GST Raid : तब्बल २१ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी मयंक मुकेश पटेल (वय ३९, रा. डोंबिवली पश्चिम, ठाणे) याला आज अटक करण्यात आली.
GST Raid Kolhapur

GST Raid Kolhapur

esakal

Updated on
Summary

करचुकवेगिरीप्रकरणी अटक:

तब्बल २१ कोटी रुपयांच्या करचुकवेगिरीप्रकरणी वेलनेस हेल्थटेक कंपनीचा कर प्रणाली व्यवस्थापक मयंक मुकेश पटेल (३९, डोंबिवली पश्चिम) याला केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडील पथकाने अटक केली.

गुन्ह्याचा प्रकार:

पटेलने विक्रोळीतील कंपनीच्या कागदपत्रांमध्ये बनावट खरेदी-विक्री दाखवून ८ कोटी रुपयांचा कर चुकवला तसेच स्वतःची कंपनी कागदोपत्री दाखवून १३ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याचे उघड झाले.

न्यायालयीन कार्यवाही:

कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केल्यानंतर पटेलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याच्यासोबत इतर कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.

GST Department Action : तब्बल २१ कोटी रुपयांची करचुकवेगिरी केल्याप्रकरणी मयंक मुकेश पटेल (वय ३९, रा. डोंबिवली पश्चिम, ठाणे) याला आज अटक करण्यात आली. मुंबईच्या वेलनेस हेल्थटेक कंपनीचा कर प्रणाली व्यवस्थापक म्हणून तो काम पाहात होता. केंद्रीय जीएसटीच्या गुप्तचर विभागाच्या कोल्हापूर कार्यालयाकडील पथकाने ही कारवाई केली. त्याला कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. वेलनेस हेल्थटेक कंपनीचे विक्रोळी कार्यालयाकडे मयंक पटेल कर प्रणाली व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. कंपनीकडून कर चुकवला जात असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर पथकाला मिळाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com