
Jobs In Kolhapur
esakal
Kolhapur Economic Development :‘इंजिनिअरिंग, कृषी प्रकिया, पॅकेजिंग आदी क्षेत्रांत गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि तंत्रज्ञान असलेल्या कोल्हापुरात इंडोनेशिया द्विपक्षीय गुंतवणूक, उद्योग सहकार्यासाठी तयार आहे. भारत - इंडोनेशिया संबंधांना अधिक गती देत कोल्हापूर हे नव्या आंतरराष्ट्रीय भागीदारीसाठी भविष्यात महत्त्वपूर्ण केंद्र होईल. त्यादृष्टीने आमची सर्वतोपरी मदत राहील’, अशी ग्वाही इंडोनेशियाचे कौन्सिलेट जनरल एडी वार्डोयो यांनी आज येथे दिली.
येथील कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्या झंवर सभागृहात उद्योजक, व्यापारी-व्यावसायिकांसमवेतच्या बैठकीत त्यांनी संवाद साधला. यावेळी मुंबई येथील इंडोनेशियन कौन्सिलेट अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख इको ज्युनॉर, अधिकारी दायन हयाती सॅम्सूवीर किबे, प्रशासन विभागाचे मुस्तफा अन्सारी, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी प्रमुख उपस्थित होते.