मलकापूर : येथील नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २) होणाऱ्या मतदानाची सर्व तयारी झाली आहे. दहा केंद्रांवर एकूण ९३ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे यांनी दिली..मतदारांनी आज निर्भयपणे शंभर टक्के मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले, ‘येथे एकूण दहा ठिकाणी मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी १५ केंद्राध्यक्ष, ४५ मतदान अधिकारी, दोन क्षेत्रीय अधिकारी, पाच मास्टर ट्रेनर व दहा शिपाई असे एकूण ९३ कर्मचारी नियुक्त केले आहेत. .Kolhapur News : “३१ डिसेंबर अंतिम मुदत! रस्ते कामांचा खेळखंडोबा थांबवा,” क्षीरसागरांची ठेकेदारांना तंबी; विलंब झाला तर थेट ब्लॅकलिस्ट.मतदान शांततेत व्हावे, अनुचित प्रकार घडू नये यासाठी चार पोलिस अधिकारी, २९ पोलिस व ४० होमगार्ड असा कडक बंदोबस्त ठेवला आहे. ४९३४ मतदार आहेत.’ प्रत्येक मतदारास नगराध्यक्षास एक व संबंधित प्रभागातील अ व ब ठिकाणाचे उमेदवारांना प्रत्येकी एक असे तीन मतदान करण्याचा अधिकार आहे. .प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क निर्भयपणे व शांततेत बजावावा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप उबाळे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश लव्हे यांनी केले आहे. निवडणूक विभागाकडे काम करणारे प्रसाद हर्डिकर, महेश गावखडकर, प्रदीप पाटील, अनिकेत शिंदे, चित्रा पाटील, अमर पाटील, सुनील सोळंकी उपस्थित होते. .Kolhapur Traders : मार्केट सेस रद्द करण्यासाठी कोल्हापूर बंदची हाक; व्यापाऱ्यांचा निर्धार आणि शासनाला दिलेला ठाम इशारा!.नगराध्यक्षपदासाठी तीन तर नगरसेवकांच्या १९ जागांसाठी ५४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. प्रभागनिहाय मतदार असे प्रभाग १ (३६३), प्रभाग २ (५३३), प्रभाग ३ (३८८), प्रभाग ४ (४८२), प्रभाग ५ (५८३), प्रभाग ६ (५३०), प्रभाग ७(५७३), प्रभाग ८ (४४८), प्रभाग ९ (५०६), प्रभाग १० (५२८)..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.