
कोल्हापूर : ऑनलाईन पेमेंटच्या वेळेत न झाल्याच्या कारणावरून आशीष तानाजी कुडित्रेकर (वय ३२, रा. रामानंदनगर) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दुकानदार राजेंद्र चव्हाण (वय ६५, रा. मुक्तसैनिक वसाहत) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. जखमीच्या हाताला गंभीर दुखापत झाली.