
Ichalkaranji Crime
esakal
भरदिवसा जीवघेणा हल्ला – कबनूर (ता. हातकणंगले) येथे प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून प्रमोद शिंगे व त्यांच्या पत्नी अश्विनी यांच्यावर चौघांनी कोयत्याने हल्ला केला; प्रमोद यांच्या उजव्या हाताचे बोट तुटले व दोघेही गंभीर जखमी झाले.
तोडफोड व पोलिसांची कारवाई – हल्लेखोरांनी शिंगे यांच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली; शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन कोयते जप्त केले व सीसीटीव्ही व मोबाईल लोकेशनच्या आधारे चौघांना (जमीर मुलाणी, आर्यन मुलाणी व दोन साथीदार) ताब्यात घेतले.
ग्रामपंचायत कार्यालयासमोर खळबळ – ग्रामपंचायत कार्यालयासमोर झालेल्या या रक्तरंजित घटनेने परिसरात खळबळ माजली; घटनास्थळी तुटलेले बोट व हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत.
love Marriage Dispute Ichalkaranji : कबनूर (ता. हातकणंगले) येथे प्रेमविवाहात मध्यस्थी केल्याच्या रागातून भरदिवसा दांपत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. तोंडाला स्कार्फ बांधून आलेल्या चौघांनी कोयत्याने केलेल्या हल्ल्यात प्रमोद बाबासाहेब शिंगे (वय ३९, रा. कबनूर) यांच्या उजव्या हाताचे बोट तुटले असून त्यांच्या पत्नी अश्विनी यांनाही गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखोरांनी शिंगे यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडून तोडफोड केली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन कोयते जप्त केले असून जखमींवर आयजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.