

Mandal officer caught red handed taking bribe
esakal
Kolhapur Revenue Department Corruption : शेत जमिनीच्या सात-बारा पत्रकी नाव नोंदविण्यासाठी लाच घेताना येथील मंडल अधिकारी कुलदीप शिवराम जनवाडे (वय ४०, रा. अरुण सरनाईक नगर, फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) याला आज ताब्यात घेण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या मंडल कार्यालयात दुपारी तीनच्या दरम्यान सापळा रचून २७ हजार रुपयांची लाच घेताना जनवाडेवर कारवाई केली.