Kolhapur Crime : अंबाई टँक कॉलनीत बेछूट गोळीबार करणाऱ्या मानसिंग बोंद्रेला कोल्हापुरात अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेछूट गोळीबार प्रकरणी कोल्हापुरात मानसिंग बोंद्रेला अटक

बेछूट गोळीबार प्रकरणी कोल्हापुरात मानसिंग बोंद्रेला अटक

कोल्हापूर: अंबाई टँक कॉलनी (Ambai Tank Colony) येथे महिन्यापूर्वी बेछूट गोळीबार करून पसार झालेल्या मानसिंग बोंद्रे (वय ४०, रा. अंबाई टँक कॉलनी कोल्हापूर) (Mansing Bondre) याला जुना राजवाडा पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेने आज (दि.१५) मध्यरात्री अटक केली.

मानसिंग विजय बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी) याने राहत्या घराच्या कंपाऊंडजवळ अंदाधुंद गोळीबार (Shooting)केला होता.दसरा चौक येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून हा प्रकार केला होता. याप्रकरणी मानसिंग बोंद्रे यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात (Rajwada Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला . गोळीबारानंतर मानसिंग बोंद्रे महिनाभर पसार होता.

हेही वाचा: आजींच्या लिफ्टचा थरार! चक्क महापालिकेच्या घंटागाडीला लटकून प्रवास

आज दुपारी त्यास कसबा बावडा (Kasba Bawda) येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याच्या शोधासाठी संयुक्त पथकाने विविध ठिकाणी छापे टाकले. मात्र, पोलिसांना चकवा देत तो फरार राहिला. अटकपूर्व जामिनासाठी त्याने जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court)धाव घेतली होती.मात्र, दोन्ही ठिकाणी त्याचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याचा साथीदार यदुनाथ यादव (रा. राजोपाध्येनगर) याला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. मानसिंग बोंद्रे फरार होता. अखेर पोलिसांनी त्याला मध्यरात्री अटक केली. याबाबत मानसिंग बोंद्रे याचा चुलत सावत्र भाऊ अभिषेक चंद्रकांत उर्फ सुभाष बोंद्रे (वय 33, रा. अंबाई टँक कॉलनी, शालिनी पॅलेस जवळ कोल्हापूर) यांनी फिर्याद दाखल केली होती.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top