
Kolhapur Shivsena Dispute : शिवसेनेतील फुटीनंतर जिल्ह्यात पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाप्रमुख पदावरील रविकिरण इंगवले यांच्या निवडीने ठाकरे शिवसेनेतील खदखद उफाळून आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जिल्ह्यात उरलेल्या ठाकरे सेनेत छुपे दोन गट होते; पण आता निवडीवरून या दोन गटांतील मतभेदही चव्हाट्यावर आले आहेत. यातून पक्षाची भविष्यातील वाटचाल धोकादायक बनण्याची शक्यता आहे.