esakal | जमिनीवरील अतिक्रमणाबाबत वीरजवानाचे कुटुंबीय थेट मुख्यमंत्र्यांकडे
sakal

बोलून बातमी शोधा

जमिनीवरील अतिक्रमणाबाबत वीरजवानाचे कुटुंबीय थेट मुख्यमंत्र्यांकडे

आता सुलोचना यांचा मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सत्यवान आणि मुलगी जमीन अतिक्रमण मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत.

जमिनीवरील अतिक्रमणाबाबत वीरजवानाचे कुटुंबीय थेट मुख्यमंत्र्यांकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : शहिद जवानाच्या कुटुंबियांना गगनबावडा तालुक्यात सरकारकडून दिलेल्या जमिनीवर अतिक्रमणे वाढत आहेत. बळजबरी, दादागिरी होत आहे. स्थानिक प्रशासनाकडून दाद दिली जात नसल्यामुळे मरणोत्तर वीरचक्र प्राप्त असलेल्या लक्ष्‍मण वासुदेव रावराणे यांचा मुलगा सत्यवान यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे.

सैनिक लक्ष्मण वासुदेव रावराणे हे १९७१च्या भारत-पाकिस्थान युद्धात शहीद झाले. त्यांना मरणोत्तर वीरचक्र प्रदान करण्यात आले. सरकारने कुटुंबियांना मौजे असंडोली पैकी रावणवाडी (ता.गगनबावडा, जि.कोल्हापूर) येथे सुमारे सव्वातीन हेक्टर जमीन पत्नी सुलोचना यांना बक्षीस दिली. मात्र आजही या जमिनीवर अतिक्रमणे वाढत आहेत. पूर्वी कच्ची घरे झाल्या पासून ते तहसिलदार, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे दाद मागितलीही जात होती, मात्र कोणीही जुमानले नाही.

हेही वाचा: 'तारीख ठरवली राणेंनी पण श्रेय घेतलं राऊतानी'

आता सुलोचना यांचा मृत्यूनंतर त्यांचा मुलगा सत्यवान आणि मुलगी जमीन अतिक्रमण मुक्त होण्यासाठी धडपडत आहेत. मात्र लालफितीचा सरकारी कारभाराने त्यांना मेटाकुटीस आणले. अखेर त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितली. आजही त्यांच्या जमिनीवर पक्क्या घरांचे अतिक्रणम होत आहे, याच्या छायाचित्रांसह त्यांनी व्यथा मांडणारे पत्र पाठविले. मुख्यमंत्री कार्यालयानेही अर्जाची पोहच त्यांना दिली आहे.

१९७५ पासून सुमारे ४६ वर्षे महसूल आणि पोलिस यंत्रणेकडे दाद मागत असतानाही मरणोत्तर वीर चक्र प्रदान असलेल्या कुटुंबियांना कोणीही दाद दिली नाही. एकदा लोकशाही दिनात सुद्धा मुलगा सत्यवान रावराणे यांनी दाद मागितली, मात्र अतिक्रणाचा विषय बाजू ठेवून प्रकरण निकाली काढण्यात आल्याची माहिती रावराणे यांनी ‘सकाळ'कडे दिली. सध्या काहींनी दादागिरी, बळजबरी करून तेथे अतिक्रमणे सुरू आहेत. सरकारी बाबूंकडून हे रोखले जात नसल्यामुळेच अखेरच्या टप्प्यात त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागण्यांचे आणि सरकार दरबारी होत असलेली अहवेलना मांडली अहे.

हेही वाचा: 'शहराला नवे कारभारी लाभुदे, साचलेल्या चिखलात कमळ फुलू दे'

"गगनबावडा तालुक्यातील साळवण येथील मंडल अधिकाऱ्यांनी आता सुनावणीसाठी बोलाविले आहे. मात्र अतिक्रणे हटविण्या पेक्षा अन्य काही कारणे सांगून हे प्रकरण फाईल बंद होईल, अशी भिती आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालून कोणाच्या आशिर्वादाने आमच्या जागेत अतिक्रणे सुरू आहेत. याचा पाठपुरावा करून एका वीरचक्र मिळालेल्या जवानाला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा."

- सत्यवान रावराणे, प्रतिभानगर, कोल्हापूर

loading image
go to top