
लुमाकांत नलवडे
कोल्हापूर : औषधांच्या किमती आणि कमिशन यामुळे रुग्णांच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शंभर ते हजार टक्के वाढीव किमतीने औषधांची विक्री होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधितांकडून सांगण्यात येते. विशेष करून मोठे आजार, अतिदक्षता विभागात लागणारे साहित्य, शस्त्रक्रियेसाठी आवश्यक औधषांसह साहित्याचा यामध्ये समावेश आहे. यावर नियंत्रण आणले तर कैकपटीने रुग्णांच्या वैद्यकीय खर्चात कपात होऊ शकते. यावर नियंत्रण ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणेने हे गांभिर्याने घेतल्यास काही प्रमाणात दिलासा शक्य आहे.