वस्त्रोद्योगासाठी राज्य सरकारच्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी : प्रकाश आवाडे

meeting with political leaders and ajit pawar tropic of cottage industry in kolhapur
meeting with political leaders and ajit pawar tropic of cottage industry in kolhapur

इचलकरंजी (कोल्हापूर) : वस्त्रोद्योग आणि सूत गिरण्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंगळवारी दुपारी 2.30 वाजता मंत्रालयात महत्वपूर्ण अशा व्यापक बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीसाठी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील - यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, मदन कारंडे, अशोक स्वामी आदींसह संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निमंत्रीत केले आहे. 

राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासह यंत्रमाग क्षेत्रासाठी कोणतीच तरतूद केली नव्हती. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. तसेच वस्त्रोद्योगासाठी राज्य शासनाने जाहीर केलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करुन या उद्योगांना मदत करावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती. या पार्श्‍वभूमीवर होत असलेल्या या बैठकीत कोणते निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे.

गेल्या काही वर्षापासून वस्त्रोद्योग विशेषत: यंत्रमाग व्यवसाय व सहकारी सूतगिरण्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. राज्य शासनाने या उद्योगांना उभारी देण्यासाठी विविध प्रकारच्या सवलतींचा निर्णय घेतला आहे. परंतू त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली नसल्यांने या उद्योगातून शासनाच्या धोरणाबाबत नाराजीचा सूर आहे. अशा परिस्थीतीत वस्त्रोद्योगाला बुस्टर डोसची गरज आहे. अन्यथा हीच परिस्थिती कायम राहिल्यास यंत्रमाग व्यवसाय पूर्णत: मोडकळीस येण्याची शक्‍यता आहे. 

हेही वाचा - पुणे बंगळूर नॅशनल हायवेवर भीषण अपघात; कोल्हापूरच्या एकाचा मृत्यू 
 
दरम्यान, राज्य शासनाने अडचणीतील वस्त्रोद्योगाला सावरण्यासाठी तातडीने बैठक बोलावून योग्य तो मार्ग काढावा. तसेच जाहीर शासन निर्णयांची अंमलबजावणी करुन या उद्योगास मदत करावी, अशी मागणी आमदार आवाडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. ही बैठक होत असून या बैठकीत होणाऱ्या निर्णयाकडे राज्यातील वस्त्रोद्याचे लक्ष लागले आहे. 

बैठकीसाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री नितीन राऊत, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई, सहकार राज्यमंत्री विश्‍वजित कदम, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार संजय शिंदे, आमदार सुमनताई पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार आसिफ शेख आदींनाही निमंत्रीत केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com