

63 Passengers Terrified as Flight Makes Rough Landing in Kolhapur
sakal
कोल्हापूर/शाहूनाका: नवी मुंबई-कोल्हापूर विमानाचे रविवारी रात्री कोल्हापूर विमानतळावर 'हार्ड लैंडिंग' झाले. धावपट्टीवर उतरतानाच विमानाच्या चाकांचे धावपट्टीशी घर्षण झाल्याने विमान उतरता उतरता पुन्हा हवेत झेपावले. या प्रकारामुळे विमानातील सुमारे ६३ प्रवाशांच्या काळजात धस्स झाले. मात्र, विमान काही काळ हवेत घिरट्या घालून पुन्हा धावपट्टीवर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.